सदर परीक्षेची सुधारित निवडयादी व गुणयादी मंगळवार दिनांक 19/03/2019 रोजी सायं. 5.00 वाजता परिषदेच्याwww.mscepune.in व www.nts.mscescholarshipexam.in संकेतस्थळावर घोषित करण्यात येत आहेत. |
1) | निवड झालेल्या विद्यार्थांना या कार्यालयामार्फत स्वतंत्ररित्या त्यांचे शाळेमार्फत कळविण्यात येईल. |
2) | राष्ट्रीयस्तर परीक्षा दि. 16 जून 2019 रोजी होणार आहे. संबंधीत निवड यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे मे 2019 च्या पहिल्या /दुसऱ्या आठवड्यात NCERT नवी दिल्ली यांच्या www.ncert.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येतील. |
3) | सदर परीक्षेसाठी गुंपडताळणी केली जात नाही. सदर परीक्षेसाठी विद्यार्थांना कार्बनलेस उत्तरपत्रिका देण्यात येते तसेच अंतिम उत्तरसूची परिषदेच्या संकेतस्थळावर देण्यात येते त्यामूळे विद्यार्थी त्यांच्या स्वतःच्या गुणांची गणना करू शकतात. |
4) | आरक्षित संवर्ग / दिव्यांगत्व आरक्षण असलेल्या विद्यार्थ्यांचे बाबतीत सदरची निवड यादी तात्पुरत्या स्वरूपाची असून संबंधीत विद्यार्थ्यांनी जातीच्या व दिव्यांगत्वाची सक्षम अधिकाऱ्यांच्या दाखल्याची सत्य प्रत NCERT नवी दिल्ली यांना प्रवेशपत्रासोबत परीक्षा केंद्रावर सादर केल्यानंतरच त्यांची निवड अंतिम समजण्यात येईल. |
5) | उत्तीर्ण होण्यासाठी MAT व SAT या प्रत्येक विषयात 40% गुण व S.C, ST व दिव्यांगत्वासाठी 32% गुण आवश्यक आहेत. |
6) | MAT व SAT विषयातील खाली नमूद केलेल्या माध्यमातील काही प्रश्न रद्द झालेले असल्याने MAT व SAT विषयाचे गुणदान करताना एकूण 100 प्रश्नांच्या प्रमाणात गुण देण्यात आलेले आहेत. |
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.